महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

अनियंत्रित कारची दुचाकीला जोरदार धडक : दाम्पत्य जखमी बातम्या - Chandrapur

अनियंत्रित कारची दुचाकीला जोरदार धडक : दाम्पत्य जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर–चंद्रपूर महामार्गावरील एपीजे अब्दुल कलाम गार्डनजवळील वळणावर अनियंत्रित कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना २० ऑगस्ट रोजी दुपारी २.४५ वाजता घडली. या अपघातात दुचाकीस्वार सुरज खिरटकर २३ वर्ष आणि त्यांची पत्नी दिपाली खिरटकर २० वर्ष रा. चंद्रपूर, हे दोघे जखमी झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली.सुरज खिरटकर हे पत्नीसमवेत स्कूटी क्रं एमएच ३४ सीटी ६२९९ ने बल्लारपूरहून चंद्रपूरकडे जात होते. याचवेळी कोठारी येथील ईशांत वांढरे १९ वर्ष हा कार क्रं एमएच ३४ बीआर ९८९५ ने चंद्रपूरच्या दिशेने जात होता. एपीजे अब्दुल कलाम गार्डनजवळील वळणावर कार अनियंत्रित होऊन दुचाकीला धडकली. धडकेनंतर दुचाकी रस्त्यालगतच्या भिंतीवर जाऊन आदळली. अपघाताची माहिती मिळताच टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत जखमी दाम्पत्याला चंद्रपूर येथील सामान...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
राजीव गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागात अभिवादन बातम्या - Chandrapur

राजीव गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागात अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक बांधकाम विभाग, बल्लारपूर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशसेवा, राष्ट्रीय एकात्मता आणि विकासाच्या मूल्यांना अनुसरून शपथ घेतली.सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता संजोग मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजीव गांधी यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या आधुनिक भारताच्या निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. तंत्रज्ञान, शिक्षण आणि युवकांच्या सहभागातून देशाच्या विकासाला गती देण्याचे कार्य त्यांनी केले, असे यावेळी नमूद करण्यात आले.कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयातील अभ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
२१ ऑगस्टला महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर चे आयोजन बातम्या - Chandrapur

२१ ऑगस्टला महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर चे आयोजन


- नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमात विद्यार्थी, युवक, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंवर्धनाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.अशी आहे कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाची सुरुवात २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथून होणार असून सुमारे ३ किलोमीटरची ही वॉकेथॉन जुना वरोरा नाका - प्रियदर्शनी चौक - जटपुरा गेट - प...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दीक्षाभूमीवरील कार्यक्रमासाठी परवानगीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बातम्या - Chandrapur

दीक्षाभूमीवरील कार्यक्रमासाठी परवानगीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस                                                                                                                   प्रतिनिधी / चंद्रपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त १५ व १६ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर रॅली व कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी द्यावी, तसेच दीक्षाभूमी परिसरातील विविध प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी दीक्षाभूमी मुक्ती जनआंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली.दीक्षाभूमीवर १९९१-९२-९३-९४ या कालावधीत बौद्ध व आंबेडकरी जनतेच्या सहभागातून धम्मच...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कोरपणा मध्ये ६०० विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्ती ची शपथ बातम्या - Chandrapur

कोरपणा मध्ये ६०० विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्ती ची शपथ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त स्टेल मॅरिस स्कूल, कोरपणायेथे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेतील सुमारे ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अंमली पदार्थांचे सेवन न करण्याची शपथ घेतली.या कार्यक्रमात कोरपणा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार लता वढीवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी अंमली पदार्थांचे सेवन टाळण्यासोबतच कायद्याचे पालन, सायबर गुन्हे, वाहतूक नियम, POCSO कायदा, बालवयात नकळत होणाऱ्या चुका टाळण्याचे उपाय, चांगल्या मित्रांची निवड तसेच सुजाण नागरिक म्हणून असलेली कर्तव्ये याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा तयार केला. या मानवी साखळीतून NO DRUGS असा संदेश साकारण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या म...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती बातम्या - Chandrapur

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थी व युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बल्लारपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, नापोअं सचिन अल्लेवार व मपोहवा अनिता मोहुर्ले यांची उपस्थिती होती. मदन दिवटे यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगितले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. दिवाकर मोहितकर होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप सोनोने यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
आरोग्याचा डोस मिळणार आता गावच्या दारात बातम्या - Chandrapur

आरोग्याचा डोस मिळणार आता गावच्या दारात


- पाटाळा डोंगरगावात नवीन उपकेंद्रांचे लोकार्पण , ५७ हजारांहून अधिक नागरिकांना मिळणार आरोग्यसेवाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू नागरिकांना त्यांच्या जवळच तत्पर व दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पाटाळा आणि डोंगरगाव येथे नवीन आरोग्य उपकेंद्रे उभारण्यात आली आहेत. आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते शनिवारी १५ या दोन्ही उपकेंद्रांचे लोकार्पण करण्यात आले.पाटाळा येथे ८२ लाख ५२ हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या उपकेंद्रामुळे राळेगाव, मनगाव, थोराणा, कुचना, नागलोण आणि कावडी परिसरातील तब्बल ५५ हजार नागरिकांना १३ प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. तर डोंगरगाव येथे ५४ लाख ६२ हजार रुपये खर्चून साकारलेल्या उपकेंद्राचा डोंगरगाव, खापरी, टाकळी आणि निमसडा परिसरातील सुमारे २ हजार ७०० नागरिकांना थेट ल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
भिवकुंड कोळसा ब्लॉक वेकोलि कडे देण्याची मागणी बातम्या - Chandrapur

भिवकुंड कोळसा ब्लॉक वेकोलि कडे देण्याची मागणी


- माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन , विसापूर-नांदगावच्या ग्रामस्थांची रोजगार व विकासासाठी भूमिकाविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीला देण्यात आलेल्या भिवकुंड कोळसा ब्लॉकमधील कोळसा उत्खननाचा कालावधी संपल्याने हा कोळसा ब्लॉक शासनाने तातडीने वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या शासकीय कंपनीकडे वर्ग करावा आणि त्यामार्फत खाण प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी विसापूर व नांदगाव परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांनी केली आहे.या मागणीसंदर्भात महाराष्ट्राच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन साद करण्यात आले. भिवकुंड कोळसा ब्लॉकचा पुढील विकास शासकीय उपक्रम असलेल्या वेकोलि मार्फत झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासोबतच परिसराच्या विकासालाही चालना मिळे...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आढळला बिनविषारी साप : सर्पमित्रांनी सुरक्षितपणे पकडून केला निसर्गमुक्त बातम्या - Chandrapur

शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आढळला बिनविषारी साप : सर्पमित्रांनी सुरक्षितपणे पकडून केला निसर्गमुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / भद्रावती : चिंचोर्डी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ १४ ऑगस्ट २०२६ रोजी बिनविषारी दिवड (धोंड्या) साप आढळून आल्याने विद्यार्थी व शिक्षकांची काही काळ धावपळ उडाली. विद्यार्थ्यांची नियमित ये-जा असलेल्या मुख्य गेटजवळच साप आढळल्याने शाळा प्रशासनाने तातडीने सर्पमित्रांना पाचारण केले. शाळेचे मुख्याध्यापक रमणे यांनी घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांशी संपर्क साधला.त्यानंतर सार्ड संस्थेचे अनुप येरणे, आशिष चायकाटे, स्नेहल शेंडे यांच्यासह सर्पमित्रांची टीम काही वेळातच शाळेत दाखल झाली. त्यांनी परिस्थितीचा काळजीपूर्वक आढावा घेत अत्यंत कौशल्याने सापाला सुरक्षितपणे पकडले. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. पकडण्यात आलेला साप बिनविषारी असून स्थानिक पातळीवर त्याला दिवड (धोंड्या) या नावाने ओळखले जाते, अशी माहि...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वरोऱ्यात पिस्तूल व जिवंत काडतुसांसह आरोपी अटकेत बातम्या - Chandrapur

वरोऱ्यात पिस्तूल व जिवंत काडतुसांसह आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  तालुका प्रतिनिधी / वरोरा : गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत अवैधरीत्या पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने अटक केली. ही कारवाई १७ ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार वरोरा विभागात पेट्रोलिंग तसेच अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी सत्यम टॉकीजच्या मागील वड्डार वस्ती परिसरात राहणारा संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असून, त्याने घरात अवैध अग्निशस्त्र बाळगल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.माहितीच्या आधारे पथकाने लभाने याच्या घरावर छापा टाकला. घरझडतीदरम्यान एक पिस्तूल, दोन मॅग्झीन आणि १० जिवंत काडतुसे आढळून आली. यासोबत आरोपीचा मोबाईल असा एकूण ८५ हजार रुपयांच...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →