महत्वाच्या बातम्या

 पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेकरीता पुरुष संघाची घोषणा


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / अमरावती : राजीव गांधी प्रोद्योगिकी विद्यापीठ, भोपाळ येथे २० ते २४ डिसेंबर २०२२ दरम्यान संपन्न होणा-या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेबल टेनिस (पुरुष) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित झाला असून खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर विद्याभारती महाविद्यालय, अमरावती येथे ८ ते १७ डिसेंबर दरम्यान होणार आहे.

खेळाडूंमध्ये बी.बी. आर्टस् महाविद्यालय, दिग्रसचा कुणाल ठाकणे, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळचा ओम पाळेकर, एल.आर.टी. महाविद्यालय, अकोलाचा केतन मुंशी व सोहम सातव, इंंदिरा महाविद्यालय, कळंबचा प्रसेंजित शेंडे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा गणेश ढिमरेकर व प्रो. राम मेघे इन्स्टिटुट ऑफ टेक्निकल रिसर्च, बडनेराचा सार्थक तभाणे यांचा समावेश आहे.





  Print






News - Rajy




Related Photos