सुरजागड येथे सशस्त्र पोलीस मदत केंद्र तयार करण्यास शासनाने दिली मान्यता


- शासन निर्णय जारी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हयातील सुरजागड लोहखणीज खाणीच्या संरक्षणासाठी सुरजागड येथे सशस्त्र पोलीस मदत केंद्र तयार करण्यास शासनाने मान्यता दिली असून तसे शासन निर्णय जारी करण्यात आले आहे.
शासन निर्णयात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील लोहखणिज खाणीच्या संरक्षासाठी सुरजागड येथे सशस्त्र मदत केंद निर्माण करण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे, याकरिता आवश्यक पदांचे पदनिर्मीतीेचे आदेश वेगळयाने निर्गमित करण्यात येतील, नवनिर्मीत पोलीस मदत केंद्राचे बांधकाम पोलीस अधीक्षक यांनी तयार केलेल्या आराखडयाच्या आधारे सुरजागड येथे खाण काम करणारी मे. लॉईड मेटल एनर्जी लि.कंपनीच्या खर्चातून करून घेण्यास सांगितले आहे.
पेलस महासंचालक यांनी ५ नोव्हेंबर २०२० रोजी पत्रान्वये गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील लोहखणीज खाणीच्या संरक्षणासाठी सुरजागड येथे सशस्त्र पोलीस मदत केंद्र निर्माण करण्यास, सदर सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी ५ पोलीस उपनिरीक्षक व १०० पोलीस शिपाई यांची पदे विशेष बाब म्हणून निर्माण करण्यास  व त्याअनुशंगाणे येणार आवर्ती खर्च ४ कोटी ४ लाख २६ हजार ७४० व अनावर्ती खर्च ८ लाख ५० हजार रूपये असा एकुण खर्च ४ कोटी १२ लाख ७६ हजार ७४० विशेष बाब म्हणून मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला असून सूरजागड येथील लाहखनिज खाणीच्या संरक्षणासाठी सुरजागड येथे सशस्त्र पोलीस मदत केंद्र निर्माण करण्यास मान्यता देण्याची बाब विचारधीन होती. त्याअनुशंगाने सदर निर्णय घेवून सुरजागड येथे सशस्त्र पोलीस मदत केंद्र तयार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-08-16
Related Photos