नागपूरमार्गे धावणाऱ्या १५ रेल्वेगाड्या चार दिवस रद्द
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी नागपूरमार्गे धावणाऱ्या १५ रेल्वेगाड्या चार दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने ऐनदिवाळीत अनेक गाड्या रद्द केल्या होत्या. त्याच्या फटका दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्यांना बसला होता. त्यावर टीका देखील झाली होती. आता ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान मेल, एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात येत आहेत. तसेच अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहे.
नागपूर- राजनांदगाव-दुर्ग दरम्यान तिसरा रेल्वे तयार करण्यात येत आहे. दुर्ग ते भंडारा असा १२२.८ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार झाला असून त्यापुढील राजनांदगाव ते कळमना दरम्यानचे काम सुरू आहे. हा तिसरा रेल्वे मार्ग सालवा स्थानकाला जोडण्यात येत आहे. म्हणून येथे नॉन-इंटरलॉकिगचे काम सुरू आहे. त्यामुळे येथून रेल्वेगाड्या अतिशय संथ गतीने चालणार आहेत. परिणामी ६ मेल व एक्स्प्रेसआणि नऊ पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर नऊ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. रद्द झालेल्या प्रमुख गाड्यांमध्ये कोरबा-इतवारी एक्सप्रेस बिलासपूर-इतवारी इंटरसिटी एक्स्प्रेस, रीवा-इतवारी एक्सप्रेस, दुर्ग- गोंदिया मेमू, रायपूर- इतवारी, तिरोडी-इतवारी एक्स्प्रेस, बिलासपूर- कोबरा पॅसेंजर सह १५ गाड्यांचा समावेश आहे.
News - Nagpur