राज्यसभेत विरोधकांचा टेबलावर चढून जोरदार गदारोळ


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. मंगळवारी विरोधी खासदारांनी हद्दच केली. राज्यसभेत जोरदार गोंधळ घालत विरोधी खासदारांनी सभागृहात जोरदार हंगामा केला. टेबलवर चढून काही खासदारांनी गोंधळ घातला. या गोंधळी खासदारांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभेत विरोधी खासदारांकडून पुस्तक फेकणे योग्य नाही. पुस्तक अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने फेकणाऱ्या विरोधी खासदारांवर सभापती व्यंकय्या नायडू कारवाई करू शकतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सभागृह नेते पीयूष गोयल आणि इतर भाजप खासदारांनी आज सकाळी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आणि याबाबत चर्चा केली.  Print


News - World | Posted : 2021-08-11
Related Photos