विद्यार्थ्यांना चार वर्षांच्या पदवीनंतर थेट पीएचडी करता येणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : विद्यार्थ्यांना चार वर्षांच्या पदवीनंतर थेट पीएचडी करता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी आज ही माहिती दिली.
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी करता येईल तसेच नवीन अभ्यासक्रम पूर्णपणे लागू होईपर्यंत तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बंद केला जाणार नाही. देशातील सर्व 45 केंद्रीय विद्यापीठांमध्ये पुढील सत्रापासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. सर्व केंद्रीय विद्यापीठांसह बहुतेक राज्यस्तरीय आणि खासगी विद्यापीठेदेखील चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम देतात.
News - Rajy




Petrol Price




