नागपूरमध्ये समोरासमोर दोन कारच्या धडकेत एकाचा मृत्यू : चार जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : फेटरी ते खडगाव गोंडखैरी बायपास मार्गावर ११ मे रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात इरफान उल्ला खान (वय ५२, रा. बंगाली पंजा, नागपूर) यांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले.
अपघातात झायलो कार (क्रमांक एमएच १४ डीडीएक्स १६५३) व ईरटीगा कार (क्रमांक एमएच ४९ एई २९२४) एकमेकांना समोरासमोर धडकली. या जोरदार धडकेत इरफान उल्ला खान यांचे निधन झाले.
जखमींना तातडीने नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे उपचार सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
या अपघाताची सविस्तर तपासणी नागपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज काळबांडे व उपनिरीक्षक प्रवीण घोडाम यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. पोलीस अपघाताचे नेमके कारण शोधत आहेत आणि वाहतूक सुरक्षेसंबंधी जनजागृतीसाठीही उपाययोजना करण्याचा विचार करत आहेत.
News - Nagpur




Petrol Price




