खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत जास्तीत जास्त खेळाचा समावेश घेऊन मोठी स्पर्धा घेणार : खासदार रामदास तडस
- खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव -2023 अंतर्गत विविध खेळांचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : भारताचे लोकप्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातील खेळाडू प्रतिनीधीत्व करावे यासाठी ‘खेलो इंडियाच्या माध्यमातून शालेय विदयार्थ्यांना क्रिडा प्रकारांमध्ये सहभाग होण्यासाठी प्रोत्साहन दिले, जिल्हयातील खेळाडूंना चालना देण्याकरिता वर्धा लोकसभा क्षेत्रात खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2023 अंतर्गत 22 खेळाचा समावेश केलेला आहे. पुढील काळात जास्तीत जास्त खेळाचा समावेश करुन मोठया प्रमाणात खासदार महोत्सव अंतर्गत क्रीडा स्पर्धा आयोजीत करण्यात येईल असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.
खासदार क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक 2023 अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथे विविध खेळाचा बक्षिस सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार डॉ. रामदास आंबटकर आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार प्रताप अडसड, म.गां.हि.वि.विद्याालयाचे प्रतिकुलपी चंद्रकांत रागीट, माजी जि.प.सदस्य नुतन राऊत, निलेश किटे, ढोमने ज्वलर्सचे संचालक अमोल ढोमने, सक्षम स्कुलचे संचालक रोषण कठाने व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. रामदास आंबटकर आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार प्रताप अडसड, म.गां.हि.वि.विद्याालयाचे प्रतिकुलपी चंद्रकांत रागीट समोयोचीत मार्गदर्शन केले. जिल्हा क्रीडा संकुल वर्धा व इतर ठिकाणी 5 दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये योगा-150 खेळाडू, बॉक्सीमध्ये 90 खेळाडू, जलतरणमध्ये 437 खेळाडू, कॅरम मध्ये 367 खेळाडू, बॅटमींटन मध्ये 820 खेळाडू, टेबल टेनिस मध्ये 80 खेळाडू, चेस मध्ये 176 खेळाडू, स्क्वॅशमध्ये 60 खेळाडू, हॉकीमध्ये पुरुष 10 टीम व महिला 6 टिम, व्हॉलीबॉल मध्ये पुरुष 12 टीम व महिला 8 टीम, बॉस्केटबॉल पुरुष 10 टिम व महिला 6 टिम, हॅन्डबॉल महिला 12 टिम व महिला 8 टिम एकुन 3500 पेक्षा जास्ती मुले/मुली, पुरुष/महीला खेळाडूनी सहभाग घेतला. सर्व गटातील विजेत्याला व विजेत्या टिमला मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. संचालन पल्लवी पुरोहीत व उपस्थिताचे आभार विपीन पिसे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वैभव तिजारे, दिपक भुते, क्रिष्णा जोशी, नितीन घोडे, चंद्रकांत चामटकर, सुनिता तडस, नौशाद शेख, रवी काकडे, विशाल उराडे, सौ. प्रिती खोडे, सुनिल साकळे मनोज झाडे, याज्ञीक बोकडे, प्रणय आंबटकर, हर्ष तिवारी, श्रीकांत खडसे, पृथ्वी शिंदे, नौशाद शेख, सचिन हजारे, साहिल इंगळे, विवेक पिल्लेवार, नौशाद शाह, सौरभ देशमुख, सौ. सुप्रिया घडे, दुधबळे, रितेश रामटेके, चेतन गुजर, वैभव उगेमगे, मंगेश कोपुलवार, किशोर वानखेडे, अजय मेश्राम, महेश वसु, सागर झाडे, निलेश वैद्य, नितीन डफळे, सौ. रंजना वानखेडे, मुळे, सुनिल मांगुळकर, शुभम जुगनाके, करण क्षिरसागर, मुकेश भावरकर, महेश हटवार, करण जैलानी, विशाल जाचक, वैभव तिजारे, शार्दुल वांदीले, वैभव राऊत , सुनिल इंगोले, नितीन जाधव, रितेश साठोणे, मृणाल नेटके, सौ. वनिता चलाख, नितु सिंह, शितल डोंगरे, चित्रा ठाकुर, सुनिल तिवारी, इंजाज शेख, लोभेष कावळे, अनिकेत तांबेकर, गौरव गावडे, राहुल गावंडे, हरिष पिसे यांनी परीश्रम घेतले, यावेळी सर्व खेळाचे पंच, कोच व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाला मोठया संख्येने खेळाडू व नागरिक उपस्थित होते.
News - Wardha