महत्वाच्या बातम्या

 विप्रोने फ्रेशर्सना दिला मोठा झटका : पगारात ५० टक्क्यांची घट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : एका बाजूला टेक आणि आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विप्रो कंपनीने एक असे पाऊल उचलले आहे की, ज्यामुळे कंपनी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

कंपनीत आपल्या पहिल्या नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या फ्रेशर्सना देण्यात येणारा पगार ५० टक्क्यांनी कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे.

पगारात ५० टक्के कपात करण्याच्या निर्णयावर कामगार संघटना एनआयटीइएस ने विप्रो कंपनीचे हे पाऊल अस्वीकार्य आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर युनियन एनआयटीइएस ने कंपनीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.

उद्योगावर लक्ष ठेवणाऱ्या काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कंपनीचा हा निर्णय जागतिक स्तरावर कंपन्यांसमोरील आर्थिक अनिश्चिततेसारख्या आव्हानांचे द्योतक आहे. 

बंगळुरूस्थित आयटी कंपनी विप्रोने याआधी उमेदवारांशी संपर्क साधून वार्षिक ६.५ लाख रुपयांचे पॅकेज देऊ केले होते, परंतु आता कंपनी त्याऐवजी ३.५ लाख रुपये वार्षिक पगार देणार आहे. उमेदवारांना हा पगार मान्य आहे का, अशी विचारणा केली जात आहे. निवड झालेले उमेदवार कंपनीत नियुक्तीची वाट पाहत होते.

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्थापन केलेल्या एनआयटीइएस या युनियनने विप्रोने उचललेल्या या पावलाचा निषेध केला आहे. एनआयटीइएस चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी कंपनीचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे आणि ते निष्पक्षता आणि पारदर्शकतेच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचेही म्हटले आहे. एनआयटीइएस चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा म्हणतात की, कंपनीच्या आर्थिक समस्यांचा बोजा फक्त कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर टाकला जावा हे अस्वीकार्य आहे.





  Print






News - Rajy




Related Photos