माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून सिरोंचा येथील वसुंधरा वाचनालयाला आर्थिक मदत
- वाचनालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सन २०१४ ते २०१९ या कालावधीत गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री व आदिवासी विकास तथा वन राज्यमंत्री असताना वन विभागाला फासील पार्क व विध्यार्थासाठी वाचनालय, इतर काही सुविधा करिता ५ कोटी निधी मंजूर केलें होते. त्या निधी मधून सिरोंचा येथे वसुंधरा वाचनालयाचे बांधकाम करण्यात आला. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुविधा झाली आणि मोठ्या प्रमाणावर वाचनालयामध्ये विध्यार्थीगण अभ्यास करत असतात.
वसुंधरा वाचनालया मध्ये काही वस्तूंची दुरुस्ती करण्याकरीता विध्यार्थीना आर्थिक अडचण भासत होती. यांची माहिती विद्यार्थ्यांनी स्थानिक सिरोंचा भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना दिली, त्यावेळी राजे यांनी आपल्या भाजपा पदाधिकारी यांच्या मार्फत वाचनालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत, वसुंधरा वाचनालयाला दुरुस्तीसाठी आर्थिक मदत केली. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी राजे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, जिल्हा प्रकोष्ट अध्यक्ष संतोष पडालवार, तालुका महामंत्री सीतापती गट्टू व वाचनालंयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli