रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ६ जणांना अटक
- चंद्रपूर, वणी येथे धाड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वेतील वाढत्या गर्दीचा गैर फायदा घेत आपल्या वैयक्तिक ओळखपत्राने रेल्वेचे तिकीट आरक्षित करून जोरात काळाबाजार करणाऱ्यांना रेल्वे सुरक्षा पोलिसांनी अटक केली.
रेल्वे सुरक्षा बल आणि सीआईबीच्या अधिकार्यांच्या 12 जणांच्या नागपूर येथील पथकाने चंद्रपूर शहर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि राजुर या तीन ठिकाणी एकत्रितपणे ही कारवाई केली. या संदर्भात पोलिसांनी ठिकठिकाणी धाड टाकून 6 जणांना अटक केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून चंद्रपूर येथील राणा गौरांग श्रीराम वार्ड, पालोजित दादाची दुधे, बालाजी वार्ड, राहुल उत्तमकुमार स्वामी, बंगाली कॅम्प, यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जब्बार अरुण चिनी, साजिद सत्तार शेख आणि राजुर कॉलरी येथील मोहम्मद खुशनूर हसमत अली यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींनी त्यांच्या दुकानातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करण्याचा गोरखधंदा चालविला होता. पोलिसांनी प्रत्येकाच्या दुकानांवर धाड टाकून त्यांच्याकडून संगणक तसेच मोठ्या प्रमाणात रेल्वेचे कंफर्म ई तिकिट जप्त केले आहे. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता रेल्वे पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
सर्व आरोपी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांची वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकीट तयार करीत होते आणि मूळ किंमतीच्या कितीतरी जास्त पटीने प्रवाशांना ते विकत होते. अशी तिकीट विक्री रेल्वेच्या नियमांनुसार बेकायदेशीर असल्याचे मानले जाते. रेल्वे तिकिटांच्या व्यावसायिक वापरासाठी रेल्वे प्रशासनाकडून स्वतंत्र एजंट आयडी प्रदान केली जाते. याच आयडींमधून तयार केलेली तिकिटे प्रवाशांना विकण्याची परवानगी आहे.
News - Chandrapur