गुड फ्रायडे निमित्त निघालेल्या रन ऑफ जीसस रैलीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केले स्वागत


- शितपेयाचे वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गुड फ्रायडे निमित्त काढण्यात आलेल्या रन ऑफ जीसस रैलीचे आंद्रिय देवालय येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी रैलीत सहभागी समाज बांधवांना शित पेयाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, हेरमन जोसेफ, विलास वनकर, दिनेश इंगळे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
गुड फ्रायडे निमित्त आंद्रिय देवालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रन ऑफ जीसस रैलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7 वाजता आंद्रिय देवालय येथून या रैलीला सुरुवात झाली. जटपूरा गेटला वळसा घालुन रैली पून्हा जयंत टॉकीज जवळील आंद्रिय देवालय येथे पोहचली येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रैलीचे स्वागत करत सहभागी समाज बांधवांना शित पेयाचे वाटप करण्यात आले.
News - Chandrapur