मृत व्यक्तीच्या कुटुंबाला खासदार अशोक नेते कडून आर्थिक मदत व सांत्वन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / उपरी : सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील गोपाळा रुषीजी भोयर हे कॅन्सरने बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांचा दोन दिवसा अगोदर मृत्यू झाला. घटनेची माहिती भाजपाचे कार्यकर्ते पत्र गेडाम यांनी भाजपा तालुकाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल तसेच खासदार अशोक नेते यांचे सहाय्यक तथा सोशल मीडिया प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गेडाम यांना दिली असता त्यांनी तत्काळ दखल घेत मृत इसमाच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत प्रदान केली.
गडचिरोली येथील कार्यालयामध्ये खासदार अशोक नेते यांनी त्यांना आर्थिक मदत देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल, महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, भाजपा युवा नेते निखिल सुरमवार, ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गेडाम, संदिप घोटेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Chandrapur