महत्वाच्या बातम्या

 अवैध रेतीची (गौणखनिज) चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई


- वाहनासह एकूण ४० लाख ५४ हजार  रूपयाचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ०३ मे २०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. सुमारास उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन उमरेड हद्दीत बायपास चौक उमरेड रोड येथे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक टिप्पर वाहनाने होत आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार बायपास चौक उमरेड रोड येथे सापळा रचुन टिप्पर क्र. १) एम. एच ४९ ए.टी. ७२२२ मध्ये परवाना क्षमतेपेक्षा जास्त ०३ ब्रास रेती किंमती अदाजे १८ हजार रु. २) एम. एच-४९ ए. टी. ९२६६ च्या डाल्यात ०६ ब्रास विनापरवाना रेती किंमती ३६ हजार रू. ची विना परवाना (रॉयल्टी) आपल्या ताब्यातील टिप्परमध्ये (गौणखनिज) रेती भरून रेतीची चोरटी वाहतुक करताना मिळुन आल्याने दोन्ही टिप्पर एकुण किमती अंदाजे ४० लाख रू. मध्ये व दोन्ही टिप्पर मधील एकुण ०९ ब्रास रेती किंमती अंदाजे ५४ हजार रूपयाचा मुद्देमाल असा एकुण ४० लाख ५४ हजार रूपयाचा मिळुन आल्याने पोलीस स्टेशन उमरेड येथे टिप्पर चालक क्र. १) असीन खान वल्द अब्बास खान (२५), रा. गरीब नवाज चौक खरबी नागपूर २) संदीप राजेश गुप्ता (२६), रा. सेनापती नगर प्लॉट क्र. ३८ दिघोरी उमरेड रोड नागपूर सदर दोन्ही वाहन चालक / मालक यांच्याविरुद्ध तहसिलदार तहसिल कार्यालय उमरेड यांच्याकडुन दंडात्मक कारवाई करवुन घेण्याकरिता पोलीस स्टेशन उमरेड येथे डिटेन करण्यात आले. असुन तहसिलदार उमरेड यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

सदर कारवाई विशाल आनंद पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, डॉ. संदिप पखाले अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस हवालदार अरविंद भगत, पोलीस नायक बालाजी साखरे, अजीज शेख, मयुर ढेकळे, रोहन डाखोरे यांचे पथकाने पार पाडली.





  Print






News - Nagpur




Related Photos