पोलीस यंत्रणेस चकमा देत असलेले फरार व पाहिजे आरोपीतांच्या स्थानिक गुन्हे शाखेनी आवळल्या मुसक्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस महासंचालक म. रा. मुंबई यांनी पोलीस घटकांच्या अभिलेखावर असणाऱ्या फरार व पाहिजे आरोपीतांचा शोध घेवून कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले, असल्याने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी संपूर्ण गडचिरोली घटकात ०१ जानेवारी २०२३ ते ३१ जानेवारी २०२३ पावेतो सर्व पोलीस स्टेशन, उपविभाग व स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांनी त्यांच्या स्तरावर विशेष पथक तयार करून फरार/पाहिजे आरोपीतांचा शोध घेवून कारवाई करण्यासंबंधाने आदेशित दिले केले.
विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करून विविध पोलीस स्टेशनचे अभिलेखावर वर्षानुवर्ष फरार व पाहिजे आरोपीतांची शोध मोहिम सुरु केली असता, पोलीस स्टेशन अहेरी येथील ०६ आरोपी, पोस्ट आरमोरी ०३ आरोपी, पोस्टे मुलचेरा ०१ आरोपी असे एकुण १० आरोपी मिळुन आले.
मिळून आलेल्या आरोपीतांपैकी ०६ आरोपींची न्यायालयातून मुक्तता करण्यात आली असल्याने त्यांची नावे अभिलेखावरुन कमी करण्यात आली व उर्वरीत ०४ आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाई करीता संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे, पोलीस उपनिरीक्षक राहुल आव्हाड, महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम वाटगुरे व सर्व कर्मचारी यांनी केलेली आहे.
News - Gadchiroli