वाघाच्या हल्ल्यात महिला शेतकरी ठार : चार दिवसात चार जणांचे बळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जनावरांसाठी गवत कापण्याकरिता शेतात गेलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे घडली. रूपा रामचंद्र म्हस्के (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने चार दिवसात चार जणांचे बळी घेतले असून एक शेतकरी गंभीर जखमी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होत असून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. मृत महिलेच्या पश्चात तीन मुले व पती असा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे हळदा परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
News - Chandrapur