माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन
- पर्सेवाडा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : तालुक्यातील पर्सेवाडा येथे बिरसा मुंडा व्हॉलीबॉल क्लब तर्फे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्यनारायण परपटला, माजी पंचायत समिती सदास्य बायक्का आलाम, उपसरपंच श्रीनिवास कडार्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, राकॉ चे सोशियल मीडिया प्रमुख एमडी शानु, देवा येनगंदूला, उपाध्यक्ष सत्यम पीडगु, सरपंच किष्टय्या पोरतेट, उपसरपंच लसमय्या नलगुंठा, प्रभाकर परपटला, चंद्रकांत कोडापे, शिवानी आत्राम, सुरेश दूरके, श्रीनिवास तलांडे, अरुण वेलादी तसेच परिसरातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रथम पारितोषिक २५ हजार, द्वितीय पारितोषिक २० हजार तर तृतीय पारितोषिक १० हजार असे तीन पारितोषिक देण्यात येत आहे. या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी परिसरातील विविध गावांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी नोंदविला आहे.
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी भाग्यश्री आत्राम यांनी स्वतः मैदानात उतरून युवा खेळाडूंसोबत व्हॉलीबॉल खेळात सहभाग झाल्याने खेळाडूंमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. दरम्यान स्पर्धेसाठी गावात आगमन होताच गावकऱ्यांनी भाग्यश्री आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत केले.
News - Gadchiroli