महत्वाच्या बातम्या

 परदेश अभ्यासदौऱ्याकरीता शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे बाबत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणा-या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबावत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसीत होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप योग्यवेळी पोहचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे. कृषि विस्तार कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरीता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषि विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दौरे ही योजना राबविणेत येत आहे. तसेच भंडारा जिल्हयाकरीता महिला-१, केंद्र राज्य कृषि पुरस्कार प्राप्त/पिकस्पर्धा विजेते शेतकरी- १ इतर शेतकरी-३ असे एकुण ५ शेतकऱ्यांचा देशाबाहेरील अभ्यास दौरे बाबत लक्षांक प्राप्त आहे.

परदेश अभ्यासदौऱ्याकरीता शेतकरी निवड करणेसाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे. अभ्यास दौऱ्याकरीता जाणारा लाभार्थी हा स्वत. शेतकरी असावा. स्वतःच्या नावे चालु कालावधीचा (मागील सहा महिन्यातील) ७/१२ व ८-अ उतारा असणे आवश्यक आहे.शेतकऱ्याच्या उत्पनाचे मुख्य साधन शेती असावे व तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे (प्रपत्र-२) शेतकऱ्याचे अँग्रोस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी असणे आवश्यक आहे.

शेतकरी कुटुंबामधुन फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभाची शेतक-याने स्वखर्चाने जा इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिल जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब या व्याखेमध्ये पती, पत्नी व त्यांचे १८ वर्षाखालील मुले/मुली) शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.

शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवसी २५ वर्ष पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही परंतु शेतकरी शारीरीकदृष्ट तंदुरुस्त असल्याबाबतचं वैद्यकिय प्रमाणपत्र (किमान एम. बी. बी. एस डॉक्टरचे) सादर करावे.शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्याकरीता निवड झाल्याचे पत्र कृषि विभागाकडुन मिळाल्यानंतर देखील शेतकऱ्याने परदे दौऱ्यासाठी शारीरीकदृष्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र (किमान एम.बी. बी. एस डॉक्टरचे सादर करा कोरोनाविषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषि विभागास सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकन्या कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग ७-१० दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्या शेतकरी शारीरीकदृष्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे बंधनकारक राहील.

शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा, पुराव्यासाठी पारपत्राची मुदत वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडाव पारपत्राची वैध मुदत दौरा निघताना किमान तीन महिन्यापेक्षा जास्त असावी. शेतकरी शासकिय, निमशासकिय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर वकिल (चार्टड अकाउंटेंट), अभियंता, कंत्राटदार इ. नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमुद करावं. (प्रपत्र-२) शेतकऱ्याने यापूर्वी शासकिय (केंद्र राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषि विद्यापिठामार्फत तसेच स्थानिक स्वरा संस्थामार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे (प्रपत्र-२) शेतकरी निवडीबाबत अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राखीव असतील.

वरीलप्रमाणे परदेश अभ्यास दौऱ्याकरीता इच्छुक शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिनांक ३१/०८/२०२६ पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा श्रीमती संगिता माने यांनी केले आहे.





  Print






Related Photos