गडचिरोली : जंगली हत्तीने शेतकऱ्यास सोंडेने उचलून फेकले


- शेतकरी गंभीर जखमी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हातील छत्तीसड सीमेलगतच्या गावांत ओडीशातील हत्तीच्या कळपाने मागील आठवडयात प्रवेश केला. हत्तीचा कळप या ठिकाणावरून त्या ठिकाणी स्थलांतरण करीत आहे. मात्र स्थलांतरादरम्यान हत्तीचा कळप शेतातील पिकांची नासधूस करीत आहे. सध्या सदर हत्तीचा कळप धानोरा तालुक्यातील जंगल परिसरात आहे. यातच तालुक्यातील येरकड परिसरातील कन्हारटोला येथील शेतात बुधवार २० ऑक्टोबर रोजी रात्रोच्या सुमारास एका शेतकऱ्याला हत्तीने सोंडेत पकडून दूर फेकल्यामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्याला पुढील उपचाराकरिता नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. अशोक मैनू मडावी असे गंभीर जखमी असलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, कान्हारटोला येथील शेतात घूसून हत्ती धानाची नासधूस करीत असल्याची माहीती शेतकरी अशोक मैनू मडावी यांना माहित होताच अशोक मडावी व इतर दोन सहकारी रात्रोच्या सुमारास हत्ती ला पळवून लावण्याच्या बेताने शेतात गेले. दरम्यान हत्तीने अशोक मडावी यांच्यावर हल्ला केला. त्यांना हत्तीने सोंडेत पकडून दूर फेकले यामध्ये अशोक मडावी हे जखमी झाले. जखमी झाल्याने त्यांना आधी गडचिरोली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर मार असल्यामुळे त्यांना काल नागपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-10-22
Related Photos