किरण चंदणखेडेवर अत्याचार करून हत्याच : पोलीसांचा प्रकरणाकडे कानाडोळा


- संबधित प्रकरणात दोषी असणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची पिडीतेच्या कुटुंबाची पत्रकारपरिषेदतून मागणी
- कोणतीही कारवाई न केल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
तालुक्यातील अमिर्झा येथील किरण चंदणखेडे हिचे मृत शरीर गावाशेजारील शेततळ्यात १८ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास आढळून आले. सदर घटनेबाबत पोलीसांना माहिती दिली असता पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पंचानामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. मात्र मृतक किरणच्या अंगावर नखांचे वर, जिभ बाहेर निघालेली होती तसेच हात मुरघडलेल्या अवस्थेत दिसत असतांना सुध्दा पोलीसांनी पंचनाम्यात त्याचा उल्लेख केलेला नाही व आकस्किम मृत्यूची नोंद केली. मात्र किरणवर अत्याचार करून हत्याच केली असून या हत्याकांडात दोषी असलेल्या हत्यारास, प्रकारणाकडे कानोडोळा करणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच छवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पिडीतेच्या आई-वडील, गावकरी तसेच सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज २२ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेतून केली आहे. तसेच कोणतीही कारवई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सुध्दा देण्यात आला आला आहे.
किरण ही १६ ऑक्टोबर पासून बेपत्ता होती. याबाबत १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास किरणला मोहझरी येथील प्रफुल मोहुर्ले याने दुचाकी वाहनाने नेले असल्याचे किरणच्या लहान भावाने कुटुंबातील व्यक्तीला सांगितले असता सगळीकडे शोधाशोध करण्यात आली परंतु किरणचा कोठेही थांगपत्ता लागला नाही म्हणून किरणच्या वडीलाने प्रफुल मोहुर्ले याचे मोहझरी येथील घरी भेट दिली व किरणबद्दल माहिती विचारली असता प्रफुल हा घरी मिळून आला नाही. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास अमिर्झा गावात पुन्हा शोधा शोध केली असता गावालगतच्या शेतशिवारातील शेततलावात किरणचे मृत शरीर आढळून आले. लागलीच पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान त्यांनी पंचनामाही केला व आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र मृत शरीरावर नखांचे वर, जिभ बाहेर तसेच हात मुरघडलेल्या अवस्थेत असतांनाही पोलीसांनी कानाडोळा करत सदर बाबत कुठलाही उल्लेख केलेला नाही व आकस्मीक मृत्यची नोंद केली. तसेच मुलीच्या वडीलाला प्रेत खाजगी वाहनाने शवविच्छेदनासाठी सामान्य रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले. शवविच्छेदन अहवालात प्रथम दर्शनी मुलीवर बलात्कार व हत्या झाली नसल्याचे जाहीर केले त्यामुळे गावकऱ्यांमध्ये व मृतक मुलीच्या नातेवाईकामध्ये आक्रोष निर्माण झाला. तसेच पोलीसांनी हत्येचा पंचनामा केलेला नाही व अल्पवयीन मुलीच्या अंगावर जखमा असतांना सुध्दा पंचानाम्यात कुठलाही उल्लेख केला नाही व  मुलीने स्वत:हुन आत्महत्या केल्याचे पोलीसांनी जाहीर केले यावरून पोलीस व वैद्यकीय अधिकारी हे मारेकऱ्यांशी मिळालेले आहेत. म्हणूनच पोलीसांनी किरणच्या हत्येचा योग्यरित्या तपास केलेला नाही असा आरोप पत्रकार परिषदेतून किरणच्या वडिलांनी केला. किरणवर अत्याचार करून हत्याच केली आहे त्यामुळे किरणच्या मारेकऱ्यावर गुन्हा दाखल कराव तसेच या हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर व शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृतक किरणचे वडील, नातेवाईक संपुर्ण अमिर्झा गाववासी व विविध सामजिक संघनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेतून केली आहे. तसेच संबधितांवर कोणतीही कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण, मोर्च काढण्यात येईल याला सर्वस्वी जबाबदार निकामी पोलीस यंत्रणा व आरोग्य प्रशासन राहील असा इशाराही देण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेला मृतक किरणचे वडील सुनिल चंदनखेडे, आई सौ. सुनिता चंदनखेडे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विजय श्रृगांरपवार, अमिर्झाच्या सरपंचा सौ. सोनाली नागापूरे, उपसरपंचा संदिप भैसारे, तंमुस अध्यक्ष ढोणे, मनोज आखाडे, रामभाऊ नन्नावरे, मेघराजजी राऊत, सुजित आखाडे, अभय नेरकर, संजय चंदनखेडे, विकास चंदनखेडे, अनंता हेटकर, रूषी बारसिंगे, प्रकाश ढोलणे उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-10-22
Related Photos