गोंदियात ४१ वर्षीय युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या


- कुडवा येथील घटना; रामनगर पोलिसांत प्रकरणाची नोंद
विदर्भ नव एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या ४१ वर्षीय युवकाने कुटुंबाच्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी १० सकाळी उघडकीस आली. सुरेंद्र तुळसीदास रामटेके वय ४१, रा. कुडवा, जि. गोंदिया असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र रामटेके हा शनिवारी कामानिमित्त घराबाहेर गेला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला; परंतु तो मिळून आला नाही. दरम्यान, कुटुंबाच्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणी दिलेश मेश्राम वय ३१, रा. कुडवा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, सुरेंद्र रामटेके याला दारू पिण्याची सवय होती. दारू उपलब्ध न झाल्यास तो अस्वस्थपणे वागत असे. याच पार्श्वभूमीवर त्याने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.




Petrol Price




