पोलीस मदत केंद्र नारगुंडा येथे तीन दिवसीय भव्य लर्निग लायसेन्स मेळावा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : पोलीस मदत केंद्र नारगुंडा येथे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे संकल्पनेतून व उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकी व भारतीय डाक यांच्या संयुक्त सहयोगातून 22 डिसेंबर 2022 ते 24 डिसेंबर 2022 असे तीन दिवसीय भव्य लर्निग लायसेन्स मेळावा पार पडला.
सदर मेळाव्या साठी डाक विभागाचे अधिकारी व त्यांचा स्टाफ, नरेश वते (मंडल अधिकारी) अजय पुंगाटि( प्रोजेक्ट ऑफिसर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रभारी अधिकारी मयूर पवार यांनी केले व पोलीस दादालोरा खिडकीद्वारे देण्यात येणार्या विविध शासकीय योजनांचे महत्त्व समजावून सांगितले. उपस्थित नागरिकांना पोलीस उपनिरीक्षक लोनेकर यांनी पेसा कायदे अंतर्गत प्राप्त हक्क व अधिकार यांची जाणीव करून दिली. पोलीस उपनिरीक्षक बेले यांनी महिला व बाल संरक्षण अधिनियम कायदेविषयक माहिती दिली तसेच पोलीस उपनिरीक्षक कस्तुरे यांनी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम याविषयी माहिती दिली. पोस्ट विभागाचे अधिकारी यांनी पोस्ट विभागाबाबत देण्यात येणाऱ्या योजना, पुरवण्यात येणाऱ्या सेवा बाबत माहिती देऊन बचतीचे महत्त्व पटवून नागरिकांना खालील योजनांचे लाभ देण्यात आला.
1)प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना-52
2) हेल्थ कार्ड- 26
3)आधार कार्ड-79
4) पॅन कार्ड वितरण-27
5)नवीन पॅन कार्ड -20
6)लर्निग लायसन्स-42
7)शिलाई मशीन वाटप-1
8) सुकन्या समृद्धी योजना वितरण-17
9) नवीन सुकन्या योजना पास बुक -08
10) रेशनकार्ड प्रस्ताव-34
11) जॉब कार्ड - 5
12) उज्वला गॅस योजना-10
13) IPPB इन्शुरन्स-14
14) पोस्ट आर.डि -15
15) पोस्ट G.I पॉलिसी -14
भामरागड विभागाचे BDO मगदूम साहेबांनी स्वखर्चाने अपंग मुलीस शिलाई मशीन दिली. त्याबाबत त्यांचे आभार मानण्यात आले.
तिन दिवसीय मेळाव्यात एकूण 450 ते 500 नागरिक उपस्थित होते सर्व उपस्थित नागरिकांना जेवण व पाण्याची सोय करण्यात आली होती.
सदर मेळाव्याचे सूत्र संचलन पोलीस उपनिरीक्षक माधव लोनेकर यांनी केले तर आभार प्रभारी अधिकारी मयूर पवार यांनी मानले. तसेच सदर मेळावा पार पडण्यात जिल्हा पोलीस कर्मचार्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
News - Gadchiroli