कोंढाळा येथे महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी व स्वच्छता हीच सेवा पंधरवडा समाप्तीचे कार्यक्रम आयोजित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील ग्रामपंचायत सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रनेता लाल बहाद्दूर शास्त्री यांची १५३ वी जयंती व स्वच्छता हीच सेवा पंधरवडा समाप्तीचे कार्यक्रम आज २ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले ग्रामपंचायत कोंढाळा तर्फे स्वच्छता हीच सेवा पंधरवड्याचे आयोजन १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंत आयोजित करण्यात आले. होते, सदर कालावधीत गावातील कानाकोपऱ्यातील सकाळच्या सुमारास संपूर्ण परिसर हातात झाडू घेऊन लोकसहभागातून ग्रामपंचायत पदाधिकारी व तरुण मंडळींकडून स्वच्छ करण्यात येत होते स्वच्छता हीच सेवा पंधरवडा कोंढाळा ग्रामपंचायती तर्फे यशस्वीपणे राबविण्यात आला. आज २ ऑक्टोंबर रोजी सर्वप्रथम सकाळच्या सुमारास ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा राऊत ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील तरुण मंडळी वर्गांनी गावातील सर्व परिसर हातात झाडू घेऊन स्वच्छता हीच सेवा पंधरवडा निमित्ताने परिसर स्वच्छ केला. त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही फोटोला माल्यार्पण करून जयघोष करण्यात आला व राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रनेता लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनमानावर प्रकाश टाकण्यात आले सदर जयंती साजरी करून गावातील मुख्य मार्गावरील संत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा अर्चना करून माल्यार्पण व जयघोष करण्यात आला.
सदर जयंती व पंधरवडा निमित्ताने ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा नितीन राऊत, उपसरपंच गजानन सेलोटे, ग्रामसेवक गुरुदास मडावी, पोलीस पाटील किरण कुंभलवार, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन राऊत, सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, तंटामुक्ती उपाध्यक्ष भास्कर पत्रे, जेष्ठ नागरिक पंढरी नखाते बाबुराव राऊत, ग्रामपंचायत सदस्य शेषराव नागमोती गोकुलदास ठाकरे, प्रफुल मेश्राम, सदस्या शिल्पा चौधरी, नलिता वालदे, भुमेश्वरी गुरनुले, अंगणवाडी सेविका महिला बचत गट पत्रकार नितेश पाटील, शिशुपाल वालदे, निखिल गोरे, अजय भरें, व गावातील नागरिक उपस्थित होते.
News - Gadchiroli