६ जानेवारीचा रोजगार मेळावा स्थगित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हयात शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आल्यामुळे सदर रोजगार मेळावा स्थगित करण्यात आला आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने कळविले आहे.
News - Wardha