माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पुढाकाराने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना साहित्य वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : उद्योगविरहीत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुसंख्य सुशिक्षित बेरोजगार युवक हाताला काम मिळावा म्हणून मेहनत घेत आहेत.
असेच काही अहेरी तालुक्यातील युवकांनी पोलीस शिपाई भरतीची तयारी करीत असून या युवकांना आविसं काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी पोलीस भरतीसाठी लागणारे साहित्य वितरीत करून त्या युवकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे.
अहेरी येथील अजय कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी (२९ डिसेंबर) पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना गोळा तसेच विविध साहित्य वाटप केले. याप्रसंगी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी युवकांच्या समस्या जाणून घेत त्यांना पोलीस भरतीत निवड होण्यासाठी जिद्द चिकाटीने परिश्रम घेण्याचे आवाहन केले. काही मदत लागल्यास निसंकोचपणे माझ्याकडे या अशी ग्वाही दिली. दरम्यान अजय कंकडालवार यांच्या या मदत व प्रोत्साहनामुळे युवकांच्या अंगी नवचेतना निर्माण झाली असून युवकांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीत चालूरकार, अजय नैताम माजी जि.प. सदस्य, प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक, कार्तिक तोगम माजी उपसरपंच, अखिल जंगम, कैलाश मडावी, करणं शेंडे, जोश कन्नाके, अमन येलमुले, जय गावडे, नागेश पुरमवार, नंदू मडवी, अक्षय राऊत, अनिल मडावी, रवी अत्राम, पियूष कोंदगुरले, प्रशांत पवार, प्राशिक येवले, उदय गुरणुळे, रोहित गुरनुळे, विजय गावत्रे, राहुल मडावी, आरुषी पवार, शृष्ठी कोडापे, लता मडावी, नंदिनी मडावी, निकिता मडावी, रोशनी राऊत, कोमल उरेत, पायल वेलादी, विद्या वेलदीसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Gadchiroli