केदारनाथ येथे हेलिकॉप्टर कोसळून महाराष्ट्रातील पायलटसह सात जणांचा मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये केदारनाथ धामनजीक हेलिकॉप्टर कोसळून भयंकर अपघात झाला. यात सहा यात्रेकरूंसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आर्यन कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. सहा यात्रेकरूंना घेऊन केदारनाथ हेलिपॅड येथे लँड होणार होते. मात्र, ढगाळ वातावरण आणि दाट धुके यामुळे पायलटचे नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर गरुडचट्टी येथे कोसळले.
कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. गरुडचट्टी हे ठिकाण केदारनाथ धामपासून दोन किलोमीटर आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटली असून, पूर्वा रामानुज (26), किर्ती बरार (30) आणि उर्वी बरार (25) हे तिघे गुजरातचे तर सुजाता (56), प्रेम कुमार आणि काला (60) हे तिघेजण तामीळनाडूचे आहेत. पायलट अनिल सिंह (57) हे महाराष्ट्रातील होते.
News - World