पोलीस नक्षल चकमकीत तीन नक्षल्यांचा खात्मा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :भामरागढ तालुक्यातील केडमारा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत तीन जहाल नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश प्राप्त झाले आहे
सविस्तर वृत्त असे कि छत्तीसगढ राज्यात तीन दिवसांपूर्वी नक्षयल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणले होते त्यात १० पोलीस जवान शाहिद झाले त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात हाई अलर्ट जरी केले होते दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास नक्षल्यांचा पेरिमिली आणि अहेरी दलम हे मन्नेराजाराम ते पेरिमिली परिसरातील केडमारा येथील जंगल परिसरात तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे जंगल परिसरात शोध मोहीम राबवित असताना धबा धरून बसून असलेले नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधाधुं गोळीबार सुरु केला त्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनी देखील गोळीबार केला गोळीबारानंतर शोध मोहिमेदरम्यान शस्त्रे आणि इतर साहित्यासह तीन नक्षल पुरुषांचे मृतदेह सापडले आहेत. पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी याचा एक मृतदेह आणि इतर दोन मृतदेह पेरिमिली दलमच्या वासू आणि अहेरी दलमच्या श्रीकांत याचे असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे आणि ठार झालेला वासू याला पेरिमिली एलओएसच्या 2023 मध्ये डीव्हीसीएम पदावर आणि श्रीकांत याला उपपदावर पदोन्नती देण्यात आली होती. अहेरी LOS चे कमांडर ज्याची पडताळणी केली जात आहे. तसेच बिटलू मडावी हा यावर्षी 9 मार्च रोजी विद्यार्थी साईनाथ नरोटे याच्या हत्येसह फेब्रुवारी/मार्च 2023 मध्ये विसामुंडी आणि आलेंगा येथे रस्ते बांधकाम उपकरणांची जाळपोळ करण्याच्या दोन घटनांमध्ये मुख्य आरोपी होता.
परिसरात नक्षल विरोधी शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसशी बोलताना दिली
News - Gadchiroli