भटाळी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा


- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मैाजे भटाळी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल येथे आयोजित बैठकीत दिले.
सेमिनारी हिल्स येथील वन सभागृहात चंद्रपूर जिल्ह्यातील मैाजे भटाळी गावाच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी अध्यक्ष तथा व्यस्थापकीय संचालक (वेकोलि) मनोज कुमार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) विशाल कुमार मेश्राम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच मैाजे भटाळी गावचे सरपंच व नागरिक उपस्थित होते.
मौजे भटाळी हे गाव वेकोलि उत्खननामुळे बाधीत असल्यामुळे त्वरित पुनर्वसन व उर्वरित शेत जमीन संपादित करण्याची ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली आहे. वेकोलि व जिल्हा प्रशासनाने नियमामुसार कारवाई करावी व यासाठी आवश्यक तो सर्व्हे लवकरात लवकर पूर्ण करावा असे मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले.
News - Nagpur