क्षयरोग रूग्णांना सकस आहारयुक्त धान्य किटचे वितरण
- माजी मंत्री वडेट्टीवार यांचा पुढाकार : २५ क्षयरोग ग्रस्तांना घेतले दत्तक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यात आरोग्य विभागाच्या तपासणी अंती निष्पन्न झालेल्या अहवालानुसार तालुक्यात क्षयरोग ग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी क्षयरोग निर्मूलनासाठी तालुक्यातील २५ रूग्णांना दत्तक घेत सकस आहार युक्त धान्य कीटचे वितरण आज करण्यात आले .
ग्रामीण भागात वाढती व्यसनाधिनता, अपायकारक पदार्थांचे सेवन, पौष्टिक आहाराचा अभाव, व आरोग्य तपासणीसाठी करण्यात येणारा निष्काळजपणा यामुळे आजही क्षयरोगाचे अनेक रुग्ण आहेत. शासकीय आरोग्य योजनांमधून क्षयरोग नियंत्रणासाठी मोफत औषध उपचार मिळतो. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना औषध उपचारासह सकस आहार फार गरजेचा असून तो पुरविण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन ब्रम्हपुरी तालुक्यातील २५ रुग्णांना दत्तक घेत क्षयरोग निर्मूलनासाठी त्या रुग्णांना मोफत सकस आहार युक्त धान्य किट दरमहा देण्याचे ठरविले. त्याच अनुषंगाने आज स्थानिक ब्रम्हपुरी येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात माजी मंत्री , आ.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते क्षयरोग रुग्णांना मोफत सकस आहार युक्त धान्य किटचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प. सदस्य डॉ राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, स्मिता पारधी, किसान सेल तालुकाध्यक्ष नानाजी तुपट, माजी प. स. सदस्य थानेश्र्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, शहराध्यक्षा योगिताआमले, नगर परिषद नियोजन सभापती महेश भर्रे, नगरसेवक डॉ.नितीन उराडे, माजी सभापती नेताजी मेश्राम, सरपंच उमेश धोटे, माजी सरपंच राजेश पारधी, कृ.ऊ.बा.स. प्रशासक वामन मिसार, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष सतीश डांगे, युवक काँग्रेसचे वि. उपाध्यक्ष अमीत कन्नाके, औद्योगिक सेलचे किशोर राऊत, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, वकार खान, सोमाजी उपासे, सुधीर पंदीलवार, चोरटी सरपंच निशा मडावी यांसह अन्य पदाधिकारी तथा कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
News - Gadchiroli