पवित्र छटपूजा कार्यक्रमांना आ. किशोर जोरगेवार यांनी भेट देत भाविकांना दिल्या शुभेच्छा


- यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घाटांची स्वच्छता, मिठाईचे वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूरात विविध ठिकाणी छटपूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा छटपूजेच्या ठिकाणी आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत पुर्जा अर्चना करत उत्तर भारतीय बांधवांना महापर्व छटपूजा उत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, विधी विभाग जिल्हाध्यक्ष ॲड. परमहंस यादव, ॲड. राकेश निरवटला, सुनिल सोनार, यांच्यासह चंद्रमा यादव, हरिनाथ यादव, रोशन यादव, रमेश यादव, तारा सिंग, विष्णु यादव, विक्की यादव, अंकित यादव, उमेश केवट, तारा सिंग, विरेंद्र राजभर आदी. गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.
चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा असल्याने कामानिमित्त्य येथे इतर राज्यातील नागरिक स्थायी झाले आहे. त्यामूळे चंद्रपूरात सर्व धर्मीय उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. उत्तर भारतीय नागरिकांचा पावन महोत्सव म्हणजेच छटपूजा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यंदाही चंद्रपूर शहरातील पागलबाबा नगर आणि लालपेठ शिवमंदिर येथे छटपूजेनिमित्त्य कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी या घाटांवर भेट देऊन पूजा अर्चना केली. यावेळी आ. जोरगेवार यांनी भाविकांना छट पूजे निमित्त शुभेच्छा दिल्यात. त्या पूर्वी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या घाटांच्या स्वच्छतेसह इतर व्यवस्था करण्यात आल्या होत्या. तसेच यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने येथे पुजा अर्चना करण्यासाठी येणा-या भाविकांना प्रसाद स्वरुप मिठाईचे वाटप करत छटपूजेच्या शुभेच्छा दिल्यात.
News - Chandrapur