देसाईगंज नगरपालिका वाऱ्यावर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : नगरपालिकेचे मुख्यधिकारी विजय कुमार आश्रमा यांची राजकीय दबावातून मुदतपूर्व बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर साकोलीचे मुख्यधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांना नियुक्ती दिली. मात्र, बारा दिवसांचा कालावधी उलटूनही ते रूजू झाले नाहीत. देसाईगंजच्या मुख्यधिकारी पदावर विजय कुमार आश्रमा यांची नियुक्ती करण्यात आली होती. २१ मार्चला रुजू झाल्यानंतर आठ महिन्यांच्या आत तसेच त्यांचा परिविक्षाधीन कालावधी संपुष्टात येण्यापूर्वीच त्यांची उचलबांगडी करण्यात आली. साकोली नगरपालिकेचे मुख्यधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांना साकोली नगरपालिकेतून १० नोव्हेंबरला कार्यमुक्त करण्यात आले. या आदेशाला तब्बल बारा दिवस उलटून ते रूजू झाले नाहीत, विशेष म्हणजे रामटेके यांनी यापूर्वी दोनवेळा देसाईगंजचा कार्यभार सांभाळले आहे.
News - Gadchiroli