महत्वाच्या बातम्या

 पेंशन अदालत तथा कार्यशाळेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महालेखापाल, नागपूर यांचे कार्यालयामार्फत जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली अंतर्गत निवृत्तीवेतन घेणा-या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकाकरिता पेंशन अदालत तथा गडचिरोली जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेकरीता कार्यशाळा ०७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

सदर पेंशन अदालतीमध्ये जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली अंतर्गत निवृत्तीवेतन घेणा-या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्तीवेतनविषयक अडचणींचे शंका समाधान करण्यात येणार आहे तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांचेकरीता ई-पीपीओ, ऑनलाईन तकार निवारण प्रणाली याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

तरी जिल्हयातील राज्य शासकीय निवृत्तीवेतन / कुटूंबनिवृत्तीवेतन धारक तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर पेंशन अदालत तथा कार्यशाळेस उपस्थित राहून महालेखापाल, नागपूर यांचे कार्यालयाकडून आपले शंका समाधान करुन घ्यावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी परिपत्रकाव्दारे कळविलेले आहे.





  Print






Related Photos