उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून बल्लारपूरच्या नवीन न्यायालयीन इमारतीची पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुका न्यायालयासाठी निर्माणाधीन असलेल्या नवीन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामाची उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती राजनिश आर. व्यास यांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली. यावेळी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय के. लहोटी तसेच बल्लारपूरचे न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी (जेएमएफसी) शिवाजी राधू गुलावे उपस्थित होते.
न्यायमूर्ती राजनिश आर. व्यास, जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय के. लहोटी आणि जेएमएफसी शिवाजी राधू गुलावे यांनी निर्माणाधीन न्यायालयीन इमारतीची पाहणी करून बांधकामाची प्रगती, न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक सुविधा तसेच ॲड. आणि पक्षकारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयींचा आढावा घेतला.
महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील न्यायालयीन इमारतींपैकी उत्कृष्ट व आधुनिक इमारतींपैकी एक म्हणून ही इमारत विकसित केली जात आहे. न्यायालयीन कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासोबतच ॲड. पक्षकार आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
निरीक्षणादरम्यान बांधकामाची सद्यस्थिती, न्यायालयीन आवश्यकतांनुसार करण्यात येणाऱ्या विविध व्यवस्था आणि सुविधांबाबत माहिती घेण्यात आली. नवीन न्यायालयीन इमारत पूर्ण झाल्यानंतर बल्लारपूर तसेच परिसरातील नागरिकांना अधिक सुसज्ज, आधुनिक आणि सुविधाजनक न्यायव्यवस्था उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
यावेळी बल्लारपूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संजय बोराडे, सचिव ॲड. अरविंद तितरे यांच्यासह ज्येष्ठ ॲड. रमेश कुमार उपाध्याय, ॲड. रणंजय सिंह, ॲड. संदेश हस्ते, ॲड. किशोर पुसलवार, ॲड. विकास गेडाम, ॲड. मंगल जीवने, ॲड. खडतड़, ॲड. खनके, ॲड. जितेंद्र केशवानी यांच्यासह बार असोसिएशनचे अन्य वकील सह न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बल्लारपूरच्या न्यायिक व्यवस्थेला आधुनिक आणि सक्षम स्वरूप देण्याच्या दृष्टीने ही नवीन न्यायालयीन इमारत महत्त्वपूर्ण ठरणार असून, इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना न्यायालयीन सेवा अधिक सुलभ व सुविधाजनक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.




Petrol Price




