माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
- वाटेगट्टा येथील वीर बाबुराव शेडमाके क्रिडा मंडळ वटेगट्टा यांच्या सौजन्याने ग्रामीण रबरी बाॅल क्रिकेट स्पर्धा आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील वाटेगट्टा येथील वीर बाबुराव शेडमाके क्रिडा मंडळ वटेगट्टा यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण रबरी बाॅल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. सदर या क्रिकेट स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.
या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते. कार्यक्रमाचे सहउदघाटन गणेश दासरवार कात्रटदार हालेवारा, सुधाकर गोट्टा वेनहार इलाका, स्वप्नील कन्नालवार इ. उपस्थित होते.
यावेळी कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, रमेश गंपावार, काँग्रेस अध्यक्ष एटापल्ली, नांदु मट्टामी आ.वी.स अध्यक्ष एटापल्ली, निजाम पेंदाम, गटनेते एटापल्ली, नामदेव हिचमी, नगरपंचायत नगरसेवक एटापल्ली, लोकेश गावडे, रमेश वैरागडे, गणेश दासरवार, बळु आत्राम उपसरपंच गुरुपल्ली, प्रमोद गोडसेलवार, प्रफुल माने, लोकेश गावडे, भरती गेडाम, सैन मत्तामी, सुरेश मट्टामी, चंदू नरोटे पो.पा, पानुजी गावडे, सूकृजी पूडो, मनीषा नरोटे, नितेश नरोटे, स्वप्नील, दळसू नरोटे, झाडे काका, सैनु नरोटे, गणपत काका, नितेश मट्टामी, जयवंत मट्टामी, माधुरी धकावा, मधुकर पुडो, सचिन पांचार्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli