भंडाऱ्यात पतसंस्थेत फसवणूक : बनावट कागदपत्रांद्वारे ४.९१ लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : येथील माँ जिजाऊ महिला नागरीक सहकारी पतसंस्थेत आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्व. श्रीकांत मधुकर नंदनवार यांच्या गहाणखत असलेल्या भंडारा नझुल येथील प्लॉटवर त्यांच्या नातेवाईकांनी अनधिकृतपणे नाव नोंदवून बनावट लेटरपॅड आणि खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे चोलामंडल फायनान्सकडून ४ लाख ९१ हजार ६०० रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाबाबत संस्थेचे व्यवस्थापक तेजेन्द्र पंचबुधे यांनी भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, संबंधित प्लॉटवरील कागदपत्रांमध्ये फेरफार करून तसेच बनावट दस्तऐवजांचा वापर करून कर्ज उचलण्यात आले.
या प्रकरणाचा तपास भंडारा पोलिस उपनिरीक्षक नवखरे करीत असून, कर्ज प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या कागदपत्रांची तसेच संबंधित व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
News - Bhandara




Petrol Price




