'निर्भया' हत्याकांडाची पुनरावृत्ती : बलात्कार करून महिलेच्या गुप्तांगात टाकला रॉड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
दिल्लीत नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे देश ढवळून निघाला. एका मुलीसोबत चालत्या बसमध्ये घडलेला बलात्कार आणि त्यानंतर नराधमांनी तिची केलेली अवस्था पाहून संपूर्ण देश हळहळला. अशाच प्रकारची घटना मुंबईतल्या साकीनाका परिसरात घडली आहे. एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आल्याची अतिशय संतापजनक घटना देशाच्या आर्थिक राजधानीत घडली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
साकीनाका येथे असलेल्या खैरानी रोड परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. त्यानंतर आरोपीने तिच्या गुप्तांगात रॉड घातला. महिलेची प्रकृती अतिशय गंभीर आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच डीसीपी आणि एसीपींनी साकीनाका पोलीस ठाणे गाठले. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असावा, असा संशय पोलिसांना आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी सुरू आहे. 
महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून अनेकांना दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाची आठवण आली. त्या प्रकरणातही पीडित तरुणीसोबत असाच संतापजनक प्रकार घडला होता. साकीनाका प्रकरणात पोलिसांनी फारशी माहिती दिलेली नाही. अटक करण्यात आरोपीवर भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ३७६, ३२३ आणि ५०४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2021-09-10
Related Photos