गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरा
- आ. डॉ. देवराव होळी यांचे आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनातून विनंती
- मागील अनेक महिन्यांपासून पद रिक्त असल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत असल्याची दिली माहिती
- लवकरच रिक्त पदे भरू याबाबत केले मंत्री महोदयांनी आश्वस्त
- जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचा प्रश्न, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थांबलेले मानधन, आरोग्य विभागातील रिक्त पदे याबाबतही केली चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील वर्ग १ ची वैद्यकीय अधिकाऱ्यांची असंख्य पदे रिक्त असून सदर पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार तानाजी सावंत यांचेकडे केली.
यावेळी मंत्री महोदयांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील याबाबत आमदार महोद्यायांना आश्वासित केले.
आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी यावेळी जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचा प्रश्न, कंत्राटी सेवेत असणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे थांबलेले मानधन, आरोग्य विभागातील असणारी रिक्त पदे याबाबत विस्तृत चर्चा कुटुंब कल्याण व सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार तानाजी सावंत यांना सदर प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.
News - Gadchiroli