मार्कंडा (कं) ग्रामपंचायतीमध्ये स्थायी ग्रामसेवक द्या
- माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांची खासदार अशोक नेते यांच्याकडे मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी : चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कं) येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना आष्टी येथील ग्रामपंचायतीला अतिरिक्त पदभार दिला असल्यामुळे सदर आष्टी हि ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असल्यामुळे मूळे दोन्ही ठिकाणचा कार्यभार एकाच ग्रामसेवकावर असल्याने मार्कंडा (कं) येथील ग्रामस्थांना शासकीय कामास अडथळे निर्माण होत आहे व ग्रामपंचायतीकडून मिळाणाऱ्या शासकीय दाखल्यांकरीता मार्कंडा (कं) येथे ग्रामसेवक वेळेवर येऊ शकत नाही.
त्याकरीता नियुक्ती असलेली ग्रामपंचायत मार्कंडा (कं) येथील कार्यभार स्थायी कार्य करणाऱ्या व आपले कर्तव्याची सेवा पूर्णपणे देऊ इच्छिणाऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती तात्काळ ग्रामपंचायत मार्कंडा (कं) येथे करण्यात यावे. जेनेकरुण जनतेचा नाहक त्रास कमी होईल, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकड़े यानी अशोक नेते खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार यांच्याकडे केली आहे.
News - Gadchiroli