दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / नाशिक :
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात इयत्ता 10 वीच्या (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) आणि 12 वीच्या (उच्च माध्यमिक ) पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे लेखी व प्रात्याक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, तशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी दिली. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा 16 सप्टेंबर 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 या काळात होणार आहे. प्रात्याक्षिक परीक्षा 15 सप्टेंबर 2021 ते 4 ऑक्टोबर 2021 या काळात होणार आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा 22 सप्टेंबर 2021 ते 08 ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान होणार आहे. प्रात्याक्षिक परीक्षा 21 सप्टेंबर 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 दरम्यान होणार आहे. या परीक्षा कालावधीत विद्यार्थी, पालक, माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख व परीक्षा संचालनासाठी कार्यान्वित असलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शासकीय कार्यालये यांना परीक्षेचे वेळेपत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, ऐनवेळी अपघात झाल्यास त्यासंबंधी कोणती कार्यवाही करावी, आऊट ऑफ टर्न, प्रात्याक्षिक परीक्षा, परीक्षेसंबंधी अन्य माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी हेल्पलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे.
तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन :
परीक्षा काळात नैसर्गिक व आपत्कालीन प्रसंगी येणाऱ्या अडी-अडचणींची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी हेल्पलाइनचा उपयोग करता येईल. परीक्षा कालावधीत परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडी अडचणींचे निरसन करण्यासाठी सर्व संबंधितांनी 0253-2950410 या हेल्पलाइनवर सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात अजूनही शाळा सुरू नाहीत. शासन नियमानुसार ज्या ठिकाणी एक महिन्यापर्यंत शून्य कोरोना रुग्ण आहेत आणि एकही मृत्यू नाही, असे असेल तरच शाळा सुरू होणार आहेत. मात्र, जिल्ह्यात अजूनही रोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. निफाड आणि सिन्नर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांचे हे वर्षही घरीच बसून जायची शक्यता आहे.  Print


News - Rajy | Posted : 2021-09-17
Related Photos