महत्वाच्या बातम्या

 माता कन्यका परमेश्वरी प्राणप्रतिष्ठा महोत्सव कार्यक्रमाला माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील माता श्रीवासवी कन्यका परमेश्वरी देवीचे मंदिर तथा सभागृहाचे बांधकाम करण्यात आली आहे. या ठिकाणी तीन दिवशीया प्राणप्रतिष्ठा महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे. येथील शेवटच्या दिवशी माता वासवी कन्यक परमेश्वरी देवीच्या मूर्तीची विधिवतरीत्या स्थापना करण्यात आली आहे.

आज आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी या प्राणप्रतिष्ठा महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहून कन्याका देवीची विविध पूजा अर्चना करून देवीची दर्शन घेतले आहे. त्यावेळी माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील चांगला पाऊस पडूदे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळदे अशी माता परमेश्वरी कन्याका देवीकडे प्रथम केली.

येथील नागरिकांन कडून तसेच कमिटी कडून माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची पुष्प गुच्छ देत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आली. त्यावेळी अजय कंकडालवार यांनी येथील नागरिकांना आभार मानले.

यावेळी उपस्थित आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील महिला- पुरुष आणि कमिटीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  Print


News - Gadchiroli
Related Photos