महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा क्षेत्रातील दोन ग्रामीण रस्त्यांना प्रशासकीय मान्यता : खासदार रामदास तडस


- प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY-III) बॅच- I वर्ष 2022-23 अंतर्गत 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्र. 3  अंतर्गत वर्धा लोकसभा क्षेत्रातील वर्धा अमरावती जिल्हयात अनेक कामे मंजुरी झालेली आहे. वर्धा जिल्हयातील अतिरीक्त दोन ग्रामीण रस्त्याची कामे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातुन प्रस्तावीत केलेली होती.

अपग्रेडेशनसाठी रस्त्यांच्या कामांसाठीचे प्रकल्प प्रस्ताव ग्रामीण विकास मंत्रालय, नवी दिल्लीच्या अधिकार प्राप्त समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यावर भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने पत्र क्रमांक P-17024/15/2020- RC (FM क्रमांक 371917) द्वारे वर्धा जिल्हयातील दोन ग्रामीण रस्त्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.

वर्धा लोकसभा क्षत्रातील वर्धा जिल्हयातील अतिरीक्त दोन ग्रामीन रस्ते विकास कामामध्ये आर्वी तालुक्यातील  MRL11-SH-292 (थार)- NH -53(सारवाडी) रस्ता व देवळी तालुक्यातील T03-NH-361भिडी बाभुळगाव-सिंगारवाडी-गौळ-अडेगाव-सोनेगाव (बा)- ते SH-267 या रस्त्याचा समावेश आहे.





  Print






News - Wardha




Related Photos