पाकिस्तान - न्यूझीलंड एक दिवसीय मालिका : न्यूझीलंडने एकही सामना न खेळता दौरा केला रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / इस्लामाबाद :
पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात आजपासून एक दिवसीय मालिकेला सुरुवात होणार होती. रावळपिंडीमध्ये पहिला सामना रंगणार होता. मात्र सामना सुरू होण्याच्या काही मिनिटे आधीच न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव मैदानात उतरण्यास नकार दिला आणि संपूर्ण दौराच रद्द केला.
उभय संघांमध्ये तीन एक दिवसीय सामने आणि पाच टी-२० सामने खेळले जाणार होते. यासाठी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानमध्ये दाखलही झाला होता. मात्र रावळपिंडीमध्ये या मालिकेचा शुभारंभ होण्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हा दौरा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला असून आर्थिक नुकसानही सोसावे लागणार आहे.
पाकिस्तात क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याची माहिती दिली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आज आम्हाला सुरक्षेच्या कारणास्तव दौरा रद्द करत असल्याचे सांगितले. पाकिस्तानी सरकारने आणि पीसीबीने सुरक्षेसाठी सज्ज होते. किवी संघासोबत आलेले अधिकारीही सुरक्षेबाबत संतुष्ट होते. मात्र अखेरचा मिनिटाला ही मालिका रद्द झाल्याने जगभरातील आणि पाकिस्तानमधील क्रीडाप्रेमी निराश होतील, असे आपल्या ट्वीटमध्ये पीसीबीने म्हटले.
  Print


News - World | Posted : 2021-09-17Related Photos