गडचिरोलीत बँकेत जात असताना वृद्ध महिलेला कारची धडक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी जात असलेल्या मीरा क्षीरसागर कन्नाके (७०, रा. रामनगर, गडचिरोली) या वृद्ध महिलेला एका मंगल कार्यालयासमोर अज्ञात कारने जोरदार धडक दिली. ही घटना १० जून रोजी घडली.
अपघातानंतर तात्काळ घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी त्यांना ऑटोतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गडचिरोली पोलिसांनी जखमी महिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आणि अपघात टाळण्यासाठी नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




