महत्वाच्या बातम्या

 गुरुपौर्णिमेनिमित्त विसापूरात संत गुरु रविदास महाराजांना अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त विसापूर येथील संत रविदास संस्कार प्रबोधन केंद्रात संत गुरु रविदास महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. संत रविदास महिला समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघ, विसापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.

यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष समिक्षा भटवलकर यांनी संत गुरु रविदास महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांवर मार्गदर्शन केले. संतांच्या विचारांचा स्वीकार करून समाजात ऐक्य व समरसता निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुगिता वाढई व वर्षा दुबे यांनी केले, तर संत रविदास महिला समितीच्या अध्यक्षा संध्या वादेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास संत रविदास महिला समितीच्या सदस्यांसह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी, महिला भगिनी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos