हॉटेल रिलॅक्समध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दोन पीडित महिलांची सुटका

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरात असलेल्या हॉटेल रिलॅक्स रूम अँड लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, हॉटेल रिलॅक्स येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात आहे. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवत सापळा रचला. त्यानंतर महिला पंच, सामाजिक कार्यकर्ते तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकासह हॉटेलवर छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान सावजी पांडुरंग हस्तक (७४) व प्रदीप सावजी हस्तक (३०), दोघेही रा. वडगाव, चंद्रपूर हे पीडित महिलांकडून देहव्यापार चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मोबाईल, रोख रक्कम, कंडोम बॉक्स, रजिस्टर आणि क्यूआर कोड असा एकूण ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सावजी हस्तक याला ताब्यात घेण्यात आले असून फरार आरोपी प्रदीप हस्तक याचा शोध पोलीस घेत आहेत. दोन्ही पीडित महिलांची सुटका करून त्यांना सुरक्षित ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष निपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सुनिल गौरकार, सफौ धनराज करकाडे, पोहवा चेतन गज्जलवार दिपक डोंगरे, कर्तिक खनके, पोअं किशोर वाकाटे, प्रफुल्ल गारघाटे, सुमित बरडे, मपोहवा छाया निकोडे, मपोहवा निराशा तितरे, मपोहवा विजयमाला वाघमारे, मपोशि अपर्णा मानकर, चालक पोहवा प्रमोद डंभारे, मिलिंद टेकाम, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




