वीजचोरी पडली महागात : दोन वर्षाचा तुरुंगवास
- अहमदनगर न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील निंबळक ता. जि. अहमदनगर येथील ग्राहकास वीजचोरी करणे महागात पडले आहे. वीजचोरीप्रकरणी पाराजी नारायण रोकडे यांना अहमदनगर न्यायालयाने दोन वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकाने वीजमीटरमध्ये छेडछाड करून ३४ हजार १२९ वीज युनिटची, आर्थिक मुल्याप्रमाणे ४ लाख २४ हजार २८० रूपयांची वीजचोरी केली होती.
०८ नोव्हेंबर २०१६ ला निंबळक ता. जि. अहमदनगर येथील वीजग्राहक पाराजी नारायण रोकडे यांच्या अजित फूड्स या कंपनीच्या वीजमीटरची तपासणी करण्यात आली होती. त्यात वीज जोडणी मीटरमधील दोन स्टड कापून वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करत असल्याबाबत निदर्शनास आले होते. ग्राहकाने ०८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या ३ महिन्या आधीपासून ३४ हजार १२९ युनिटची वीजचोरी केली आहे. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मुल्यानुसार ४ लाख २४ हजार २८० रू. इतकी वीजचोरी केल्याचे दिसून आले होते. सदर गुन्ह्यासाठी तडजोड आकार १० लाख आरोपीने भरला नाही, त्यामुळे किरण महाजन यांनी महावितरणच्या विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये पाराजी नारायण रोकडे यांच्याविरूध्द एमएस सीबी पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत अहमदनगर न्यायालयाने आरोपीस दोन वर्षाची सक्त मजुरी व १५ हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजुरी ही शिक्षा ठोठावली आहे.
यामध्ये फिर्यादी यांच्यासह रमाकांत गरजे, रोहन धर्माधिकारी सहायक अभियंता, महावितरण तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता लालचंद भराडे या साक्षीदारांची साक्ष तांत्रिक बाबीचा अनुषंगाने नोंदविण्यात आले.
या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता उज्वला जि. थोरात पवार यांनी कामकाज पाहिले.
News - Rajy