देवलमरी वॉर्डात अस्वच्छतेचा अभाव : ग्रामपंचायतीचा दुर्लक्ष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यात गावातील मूलभूत समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. तालुक्यापासून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या देवलमरी येथील वार्ड क्र. १ मध्ये हातपंपाजवळ साचलेल्या घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे पुर्णपणे रस्ता चिखलमय झालेला आहे.
त्यामुळे नागरिकांना येण्याजाण्यास नाहक त्रास होत असून नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे या समस्येकडे ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने लक्ष देवून नागरिकांच्या मागणीची पूर्तता करावी, अशी अपेक्षा नागरिकांच्या वतीने व्यक्त केली जात आहे.
News - Gadchiroli