महत्वाच्या बातम्या

 लोक शिक्षण संस्था वरोडा येथील शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर मुलींच्या तिन्ही गटाचा विजय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : येथे झालेल्या नागपूर विभागीय स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात लोकमान्य कन्या विद्यालयाने विजय प्राप्त करीत राज्यस्तरावर प्रवेश मिळविला आहे. गोंदिया येथे झालेल्या नागपूर विभाग स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये १९ वर्षे मुलींच्या गटात लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाने विजय प्राप्त करीत राज्यस्तरावर प्रवेश मिळविला आहे. भंडारा येथे झालेल्या नागपूर विभाग स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलींच्या गटात लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूलने विजय प्राप्त करीत राज्यस्तरावर प्रवेश मिळविला आहे. नागपूर विभागीय स्तरावर लोकशिक्षण संस्था वरोडाचे पाच संघ सहभागी झाले होते. यामध्ये मुलींच्या तिन्ही गटात संघ विजय प्राप्त करून राज्यस्तरावर पात्र झालेले आहे. तिन्ही गटात एकाच संस्थेचे राज्यस्तरावर संघ सहभाग होण्याची नागपूर विभागातील ही पहिलीच वेळ आहे. याबद्दल शहरात संघांचे विशेष कौतुक होत आहे. लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्ण घड्याळपाटील, कार्यवाह विश्वनाथ जोशी, एडवोकेट दुष्यंत देशपांडे, मुख्याध्यापक नवले, मुख्याध्यापिका धोपटे, मुख्याध्यापक अंबुलकर यांनी अभिनंदन केले. सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय पालक, प्रशिक्षक व लोकशिक्षण संस्था वरोडा यांना दिले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos