महत्वाच्या बातम्या

 भरधाव पिकअपच्या धडकेत युवक ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : भरधाव पिकअप वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत नवेगाव ते लटोरी डांबरी मार्गावर घडली. गुरुवारी २१ सकाळी ९.३० ते ११.१५ वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला असून, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत युवकाचे नाव नरेश फुलचंद मच्छिरके (४५, रा. नवेगाव) असे आहे. प्राप्त माहितीनुसार, नरेश मच्छिरके हे आमगाव येथील आपल्या हार्डवेअर दुकानाकडे जात होते. दरम्यान, नवेगाव ते लटोरी डांबरी मार्गावर आरोपी प्रताप हेमराज लिल्हारे (४८, रा. चिचेवाडा, जि. बालाघाट) याने आपल्या ताब्यातील पिकअप वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत नरेश यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात नरेश यांच्या डोक्याला तसेच उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी ईश्वरदास प्रेमचंद मच्छिरके (५५, रा. नवेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सालेकसा पोलिस ठाण्यात आरोपी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





  Print






News - Gondia




Related Photos