साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीकरीता २८ नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार
- तहसिलदार रमेश कुंभरे यांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : साकोली तालुक्यातील माहे ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या किन्ही/ए., एकोडी, बाम्पेवाडा, पिंपकेपार, वडेगाव, जांभळी, खांबा, किन्ही/मो, सातसवाडा, मालुटोला, पाथरी, तुडमापुरी, बोदरा, सोनपूरी, जांभळी/स, मुडीपार/स, गुढरी, मोहघाटा, गिरोला, बरडकीन्ही, लवारी, उमरी, परसोडी/सौ, कुंभली, सावरबंध, बोंडे, खंडाळा, केसलवाडा, झाडगाव, सानगडी, सानगाव, विहिरगाव/बु, सासरा, सालेबर्डी, वडद, सुकळी, पापडा/बु, पळसगाव/सो, महालगाव, निलज, गोंडउमरी व वांगी या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता राज्य निवडणूक आयोग यांच्या कडून निवडणूक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमानुसार 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार आहे.
ग्रामपंचायती मधील ज्या कोणत्याही उमेदवारास व नागरिकास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरीता राखून ठेवलेल्या जागेवर निवडणूक लढवायची आहे. अशा उमेदवारांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतचे अर्ज ऑनलाईन भरून आवश्यक दस्तऐवजासह तहसिल कार्यालय साकोली येथील निवडणूक शाखेत सादर करावे, असे साकोली तहसिलदार रमेश कुंभरे यांनी कळविले आहे.
News - Bhandara